‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

सिडको (नाशिक) : कोण अधिक सामर्थ्यशाली यासाठी जणू लागली होती चढाओढ. जिवाच्या आकांताने लढले ते आमने-सामने. किव आल्याने भटक्या मांजरीने युद्ध थांबविण्याचा केला प्रयत्न, पण अखेर एकाचा अंत होता निश्चितच. ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा असाही थरार...

भटक्या मांजरीचा घोणसला वाचविण्याचा प्रयत्न 

दोन विषारी सापांच्या लढाईत एक साप जखमी होऊन मृत्युमुखी पडला. डीजीपीनगर १ मध्ये घडलेला हा प्रकार. घोणस जातीचा विषारी साप व कोब्रा जातीचा नाग यांचा आमना-सामना झाला. त्याचे पर्यवसान दोघांच्या भांडणात झाले. स्वतःचे सामर्थ्य दाखविण्याच्या प्रयत्नात कोब्रानेने घोणसला जखमी केले. ही लढाई सुरू असतानाच परिसरातील एक भटकी मांजर या ठिकाणी येऊन तिने घोणसला वाचविण्यासाठी नागाशी लढाई करण्याचा प्रयत्न केला. असे दुर्मिळ चित्र या ठिकाणी बघावयास मिळाले. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वाइल्ड लाइफ लव्हर टीमच्या हृषीकेश कांबळे, अजय काकडे, कृष्णा शर्मा, अमेय धमखे यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाचारण करत प्रथम कोब्रा जातीच्या नागाला पकडून बंद केले. घोणस जातीच्या सापाला उपचारार्थ दवाखान्यात नेत असताना तो गतप्राण झाला. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

दुर्मिळ प्रसंग 

या वेळी नागाची वन विभागाच्या कार्यालयात नोंद करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. हा दुर्मिळ प्रसंग प्रथमच बघितल्याचे सर्पमित्रांच्या टीमने सांगितले.  

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा