कोरोनाची ओसरली लाट, पर्यटकांनी धरली ‘गिरणा’ डॅमची वाट! माशांची वाढली डिमांड…   

वेहेळगाव (जि.नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या गिरणा धरण व मन्याड धरणावर कोरोनाचे सावट ओसरु लागल्याने खवय्यांची धरण परिसरात गर्दी होत आहे. सध्या जगभरात भीती निर्माण केलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यात आल्याने आता धरण परिसरात गर्दी होऊ लागली आहे.

गिरणा धरण परिसरात गर्दी; माशांची वाढली डिमांड...

खवय्यांच्या व पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील लहान हॉटेलांना व मासे विक्रेत्यांना कोरोनाचे सावट ओसरू लागल्याने आता कुठे सुगीचे दिवस आल्यासारखे वाटत आहे. गिरणा धरणात सध्या रोहु, कटला, कोंबडा, भटक्या पंकज, जातीचे मासे मिळत असून सध्या माशांची डिमांड वाढल्याने भाव देखील वाढले आहे. पूर्वी दोनशे ते अडीचशे रुपये किलो मासा होता. सध्या अडीचशे ते तीनशे रुपये किलो झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असल्याने येथे चाळीसगाव, मालेगाव ,सटाणा, कळवण, देवळा या भागातून येणार्‍या लोकांची गर्दी होत आहे.

 

"सध्या कोरोनाचे सावट ओसरल्याने व त्यात लस उपलब्ध झाल्याने घरात बसून राहिलेले लोक आता बाहेर पडू लागल्याने धरण परिसरात त्यांची गर्दी वाढल्याने माशाची डिमांड वाढली आहे भावात ही सुधारणा झाली आहे सध्या व्यवसाय तेजीत आहे.-पोपट भोई , मासे विक्रेते 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल 

"बऱ्याच दिवसापासून घरीच होतो सध्या कोरोणाचे सावट कमी झाल्याने व लस उपलब्ध झाल्याने बाहेर पडलो गिरणाधरण मोठे असल्याने तेथे असलेल्या माशांचा आस्वाद घेण्यासाठी आलो होतो सर्व मित्रांनी मिळुन आस्वाद घेतला. - सचिन देशमुख, पर्यटक चाळीसगाव

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच