कोरोनाचे नियम पायदळी! बेधुंद तरुण-तरुणींच्या हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून, रुग्‍णसंख्या वाढीचे रोज नवे उच्चांक गाठले जात आहेत. दरम्या सामान्यांसाठी कोरोना प्रतिबंधाचे नियम कडक असूनही शहरापासून दूर धरणालगतच्या हुक्का पार्लरमध्ये मात्र कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा आणखी एक प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला.

कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठत असताना सावरगाव शिवारात हॉटेल गंमत-जंमत पिकनिग स्पॉटमागे हॉटेल इलाका रिसॉर्ट आहे. तेथे लोकांची गर्दी असून अवैधपणे हुक्का पार्टी सुरु असल्याची माहीती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी स्वतः पथकासह रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत गुन्हे

गंगापूर धरणाच्या पायथ्याशी सुरु असलेल्या या हुक्का पार्लरवर पहाटे दोनच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी सतरा जण ताब्यात घेतले. तर तेथे उपस्थित ३८ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत गुन्हे दाखल केले. त्यात, हुक्का पार्टीत जागेचा मालक गौरव मौले व त्याचे साथीदार संगनमताने अनधिकृतपणे तेथील उपस्थित ग्राहकांना हुक्का साहित्य साधन पुरवित असल्याचे आढळल्याने पोलिसांनी तेथील १७ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत कारवाई केली. सिगारेट, तंबाखु जन्य पदार्थ असा सुमारे २ लाखाचे साहित्य जप्त केले. शहर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असतांनाही गर्दी करणाऱ्या सुमारे ३८ तरुण-तरुणीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ (ब) नुसार गुन्हे दाखल केले. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ