कोरोनाचे नियम पाळण्यात डॉक्टरांकडूनच हलगर्जीपणा! नाशिकमध्ये सात डॉक्टरांवर कारवाई

नाशिक : शहरात कोरोनाचा संसंर्गाचा  फैलाव पुन्हा वाढत आहे, दरम्यान नाशिक आरोग्य प्रशासन एक्शन मोडमध्ये आले असून विनाममास्क फिरणाऱ्या सात डॉक्टरांवर  साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरात रुग्ण वाढल्याने महानगरपालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. 

शहरातील एका हॉटेलमध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सेमिनार होता. या सेमिनारमध्ये उपस्थित डॉक्टरांनी मास्क परिधान केले नसल्याचे दिसून आल्याने पश्‍चिम विभागीय पथकाने सात डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई केली. डॉक्टरांवरील कारवाईमुळे वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
 

डॉक्टरांकडून नागरिकांना मास्क, हँडग्लोज वापण्याचे आवाहन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केले जाते. परंतु, डॉक्टरांकडूनच कोरोनाचे नियम पाळण्यात हलगर्जी केली जात असल्याची बाब समोर आली आहे. सात डॉक्टरांना प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे एक हजार ४०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पश्‍चिम विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आठ दिवसांत शहरातील सहा विभागांत मास्क परिधान न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत १०७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय