कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक : </strong>94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला