कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक महापालिकेत जम्बो भरती; थेट मुलाखतीतून होणार भरती

नाशिक : कोरोना संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेता महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागातर्फे जम्बो भरती होणार आहे. २१० पदांच्या भरतीत एम.डी. मायक्रोबॉयलॉजिस्टची दोन पदे, एमबीबीएस २५, बीएएमएस ३०, एमएस्सी मायक्रोबॉयलॉजिस्ट चार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३०, स्टाफ नर्स ५०, एएनएम साठ, तर डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या आठ पदांचा समावेश आहे.

मॉलिक्युलर लॅब व रुग्णालयांकरिता तीन महिने मानधनावर थेट मुलाखतीतून भरती होणार आहे. २३ मार्चला दुपारी तीन ते पाच या वेळेत थेट मुलाखत होईल. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग वाढल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकायांची कमतरता निर्माण झाली होती. त्या वेळी सहा महिन्यांसाठी भरती करण्यात आली होती, परंतु कोरोनाचा जोर ओसरू लागल्यानंतर मुदतवाढ दिली नाही. आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा भरती केली जात आहे. 
 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा