कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी; धक्कादायक बाब

नाशिक : सध्या शहरात अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जी अत्यंत धक्कादायक बाब आहे.

कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर फिरताना आढळून आल्यास....

शहरात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा ॲलर्ट झाली असून, मास्क परिधान न करणाऱ्यांवर कारवाई करताना आता कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर फिरताना आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कोरोनाबाधितांच्या हातावर क्वॉरंटाइनचे शिक्के मारले जाणार आहेत.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के

सध्या शहरात अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने कोरोनाग्रस्तांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारले जाणार आहेत.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

गुन्हे दाखल करण्याचा निर्णय

त्यानंतरही रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास महापालिका पोलिसांच्या पथकाकडून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या सहा विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.