कोरोनामुक्त झाल्यानंतरही ‘ऑटोइम्युन ॲन्टिबॉडीजचा’ आत्मघातकी हल्ला! रिॲक्टिव्ह संधिवाताच्या रुग्णात वाढ 

नाशिक : कोविडमधून सुखरूप बाहेर पडल्यानंतर आपल्या शरीरात रोगाशी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रतिद्रव्य निर्माण झालेली असतात. पण यात काही प्रतिद्रव्य आतंकवादीसारखी स्वतःवरच आत्मघातकी हल्ला करीत असतात, यास ऑटो इम्युन ॲन्टिबॉडीज, असे म्हटले जाते. अशा तयार झालेल्या ॲन्टिबॉडीज आपल्या शरीराच्या जॉइट्सवर हल्ला चढवतात. त्याला रिॲक्टिव्ह संधिवात असे म्हटले जाते. या रिॲक्टिव्ह संधिवाताचे प्रमाण राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनातून बरे झाले तरी इतर आजारांना रुग्णांना सामोरे लागत जावे असल्याने कुटुंबांमध्ये मानसिक, शारीरिक व आर्थिक ताणतणावाच्या घटना घडत आहेत. 

कोरोनाच्या मुक्ततेत प्रतिद्रव्यांचा आत्मघातकी हल्ला 

कोविड संसर्गाची लाट सर्वदूर पसरली आहे. या आजारातून बरे होण्यासाठी प्रशासकीय- आरोग्य- रुग्णाचे कुटंब अशा सर्वच यंत्रणा आपल्यापरीने रुग्ण- सदस्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोना आजारातून बरे होण्यासाठी वापरली जाणाऱ्या औषधांनी मात्र काही रुग्णांना बरे होऊन इतर आजाराने ‘जगावे की कायमची मुक्तता घ्यावी’, अशा अवस्थेत आणले आहे. कोविडमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आपल्या शरीरात रोगाशी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रतिद्रव्य विविध माध्यमाद्वारे दिली जातात. यात रुग्ण बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती निर्माण होते. मात्र, यात निर्माण झालेली काही प्रतिद्रव्य (ऑटो इम्युन ॲन्टिबॉडीज) आतंकवादीसारखी स्वतःवरच आत्मघातकी हल्ला करतात. या मुळे रिॲक्टिव्ह संधिवाताचा आजाराला काही रुग्णांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

इतर आजारांना आमंत्रण : रिॲक्टिव्ह संधिवाताच्या रुग्णात वाढ 

अशा रुग्णांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात आढळून येत आहे. दिवसाला एक- दोन रुग्णांचे प्रमाण आता पाच ते सहावर येऊन पोचले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मुळे कोरोनातून सुटका झाली मात्र इतर आजारातून सुटका नाही, अशी अवस्था रुग्णाच्या कुटुंबीयांची झाली आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

लक्षणं कोणती 
- जॉइन्ट पेन्स 
- अंग जखडण्यासारखे वाटणे 
- चालण्यास त्रास होणे 
- दैनदिन कामकाजातील लहान-लहान गोष्टी करणे अवघड जाणे (वस्तू उचलणे, कंगवा फिरवणे, कणिक मळणे) 

उपाय 
- योग्य निदान 
- योग्य व्यायाम 
- पथ्य 
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार 

कुणाला दाखवावे 
- एम.डी. मेडिसीन 
- रुमॅटॉलॉजिस्ट 

कोविड संसर्गानंतर काही दिवसांनी सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला रिअक्टिव्ह अर्थिटिस असे म्हणतात. ही सांधेदुखी योग्य औषध घेतल्यास पूर्णपणे बरी होते. 
-डॉ. प्रिन्स रायाजदे, 
रुमॅटॉलॉजिस्ट
 

 

कोविड संसर्गानंतर होणारी सांधेदुखी घेऊन बरेच रुग्ण येत आहेत. योग्य पौष्टिक आहार, शरीराला उपयुक्त असा व्यायाम आणि काही प्रमाणात औषधोपचार घेतल्यास यापासून सहज आराम मिळवता येऊ शकतो. -डॉ. जयेश सोनजे, 
अस्थिरोगतज्ज्ञ आणि सांधे प्रत्यारोपणतज्ज्ञ 

 

कोविडमधून बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये सांधेदुखी येऊ शकते. ही सांधेदुखी आठ किंवा अनेक सांध्यामध्ये येऊ शकते. ही सांधेदुखी चार ते सहा आठवडे राहू शकते. अशा प्रकारच्या सांधेदुखीला रिॲक्टिव सांधेदुखी म्हणतात. चिकन गुनिया, डेंगी यांसारख्या व्हायरल आजारानंतरदेखील यांसारखी सांधेदुखी येऊ शकते. उपचारात वेदनाशामक औषधी किंवा गरज पडल्यास स्टेरॉइडचा वापर करावा लागू शकतो. - डॉ. पंकज राणे, इनटेसिव्ह केअर फिजिशिअन