कोरोनामुळे नाशिकचे प्रसिध्द नवशा गणपती भाविकांसाठी बंद

नाशिक - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता मंदिरे सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. अंगारकी चतुर्थी निमित्त यावेळी नवशा गणपती मंदिरात शुकशुकाट दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांसाठी बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली होती, मंदिराबाहेर गर्दी होऊ नये म्हूणन पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.