कोरोनामुळे मार्केटमध्ये जाण्यास मज्जाव; एंट्री फि घेताना रांगेत कोरोना होत नाही?पाहा VIDEO

सिडको (नाशिक) : नाशिक शहरासह सिडकोत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाजी मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन यांच्या वतीने बाजारामध्ये एकाच ठिकाणी प्रवेश देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे . परंतु पहिल्या दिवशी (ता.३०) बाजारात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आल्याने चित्र बघावयास मिळाले. प्रवेशासाठी तासभर रांगेत उभ रहाव लागल्याने नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. 

कोरोनामुळे मार्केटमध्ये जाण्यास मज्जाव; एंट्री फि घेताना रांगेत कोरोना होत नाही?

भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडू नये म्हणून मनपा कर्मचारी प्रवेश फी म्हणून नागरिकांकडून पाच रुपयाची पावती फाडत आहे. रांग लावताना मात्र सहाजिकच नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. अशा वेळी मनपा प्रशासन मात्र डोळेझाक करून पावती फाडण्यात मग्न असल्याचे विदारक चित्र या निमित्ताने बघायला मिळत आहे . त्यामुळे खरा उद्देश साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे .

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

नागरीकांना बराच वेळ रांगेत ताटकळत उभ राहण्याची वेळ
महापालिकेच्या सिडको विभागाच्यावतीने मुख्य बाजारपेठ असलेल्या पवन नगर भाजी मार्केट सील करून फक्त एकाच बाजूने प्रवेश देण्यात आला होता यामुळे भाजी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळाले . भाजीबाजारात काही नागरिक हे एखादी भाजी घेण्यासाठी येत असतात व तासन् तास बाजारात टाईमपास करताना दिसून येत असल्याने यासाठी प्रशासनाने बाजारात प्रवेश करण्यासाठी पाच रुपये शुल्क ठेवले आहे. पवन नगर भाजी बाजारात सायंकाळच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . पण प्रवेश देतांना मनपाचे फक्त दोनच कर्मचारी असल्याने भाजी घेणाऱ्या महिला व नागरीकांना बराच वेळ रांगेत ताटकळत उभ राहण्याची वेळ आली होती.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण