कोरोनामुळे शहर बससेवा लांबणीवर; गर्दी करण्यावर प्रतिबंध 

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने गर्दी करण्यावर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे शहर बससेवादेखील लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला असून, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

 अंशतः: लॉकडाउनकडे वाटचाल
महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरु केली जाणार आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सेवा तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडत आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून परमीट मिळत नसल्याने आतापर्यंत सेवेत अडथळा होता. आठ दिवसांपूर्वी परमीट प्राप्त झाल्याने मार्चच्या सुरवातीला बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, याच दरम्यान कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतं असल्याचे निदर्शनास येत असल्याने पुन्हा

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

शहर अंशतः: लॉकडाउनकडे वाटचाल करत आहे. शहर बससेवा सुरु झाल्यास गर्दी होईल. प्रवाशांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना योजल्या तरी आर्थिक तोटा होणार आहे. त्याशिवाय शाळा लवकर सुरु होणार नसल्याने शाळेतील विद्यार्थी मिळणार नाही. बस ऑपरेटर्सला कार्यारंभ आदेश दिल्यास एकदा सुरु झालेली बससेवा पुन्हा बंद करता येणार नाही या सर्व बाबींचा विचार करून बससेवा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

पहिल्या टप्प्यात बससेवा सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. परंतु, कोरोनामुळे बससेवा सुरू करताना अनेक अडचणी आहेत. बस ऑपरेटर्सकडून सेवा सुरू करण्यासाठी पत्र प्राप्त झाली आहेत. सेवा सुरू झाल्यास बंद करता येणार नाही. त्यामुळे बससेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.