कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका सज्ज; पुन्हा सुरू होणार फिव्हर क्लिनिक

नाशिक : शहरात फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला असून, रुग्णांची संख्या सव्वा लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा ते आठ पटींनी अधिक रुग्ण आढळत आहेत. दररोज दोन हजारांच्या आसपास रुग्ण आढळत असून, देशात कोरोना संसर्गाचा वेगात नशिक पाचव्या स्थानावर आले आहे. दरम्यान कोरोना उद्रेक रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचबरोबर विविध स्तरावर नियोजन आखले आहे. 

पुन्हा नव्याने सुरू होणार फिव्हर क्लिनिक

फिव्हर क्लिनिकमध्ये महापालिकेने नुकतेच खरेदी केलेल्या एक लाख रॅपिड ॲण्टीजेन किटच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. ॲण्टीजेन टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी ही माहिती दिली आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

शहरात २७ ठिकाणी फिव्हर क्लिनिक

मागील वर्षात कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने शहरातील चार विभागातील २४ आरोग्य केंद्रांमध्ये फिवर क्लिनिकची निर्मिती केली होती त्या माध्यमातून रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आल्या होत्या. ॲण्टीजेन टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या २२ व्यक्तींची तपासणी केली जात होती. या माध्यमातून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यास मदत झाली होती. कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात फिवर क्लिनिक बंद करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याने फिवर क्लिनिकची योजना पुन्हा एकदा अमलात आणली जाणार आहे. त्याचाचं एक भाग म्हणून शहरात २७ ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू केले जाणार आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

पाच जणांचे पथक 

फिव्हर क्लिनिकची जबाबदारी विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांवर राहणार असून डॉक्टर, परिचारीका, शिक्षक, समुपदेशक, लॅब टेक्निशियनची नियुक्ती एका फिवर क्लिनिक मध्ये केली जाणार आहे. फिवर क्लिनिक पथकाच्या माध्यामातून नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. कोरोना लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना प्राथमिक उपचार करून कोविड सेंटरमध्ये भरती केले जाणार आहे.