कोरोनाविषयक निर्बंधांचे उल्‍लंघन झाल्‍यास कठोर कारवाई – जिल्‍हाधिकारी मांढरे 

नाशिक :  राज्यात पुन्‍हा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्‍याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १६) राज्‍यातील विभागीय आयुक्‍त, जिल्‍हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर यंत्रणा सतर्क झाली. कोरोनाविषयक नियमांचे उल्‍लंघन झाल्‍यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्‍पष्ट केले. 

राज्‍यस्‍तरीय बैठकीनंतर यंत्रणा सतर्क 

राज्‍यस्‍तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्‍यमंत्री डॉ. राजेश टोपे, अन्‍य मंत्री व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. 
राज्‍यात १५ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्‍हा वाढू लागला आहे. नाशिक जिल्‍ह्यात तुलनेने परिस्‍थिती समाधानकारक असली, तरी खबरदारी बाळगण्याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी जारी केल्‍या आहेत. येत्‍या काळात कोरोनाबाबत शासनाने जारी केलेल्‍या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले. विशेषतः लग्‍न समारंभात, बॅक्‍वेट हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रशासकीय यंत्रणेची करडी नरज असेल, असेही त्यांनी स्‍पष्ट केले. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

मास्‍क, शारीरिक अंतरावर प्रशासनाचे असेल लक्ष 

मास्‍कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग)चे पालन न झाल्‍यास विविध शासकीय यंत्रणांकडून कारवाई होणार असल्‍याचेही मांढरे यांनी स्‍पष्ट केले.  

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश