कोरोना काळातही रेल्वेवाहतुकीला अच्छे दिन! गेल्या महिन्यात ११ हजार ९६ कोटींचे उत्पन्न 

नाशिक : कोरोनाचे आव्हान असतानाही गेल्यावर्षीच्या तुलनेत गेल्या महिन्यात रेल्वे मालवाहतुकीचे प्रमाण अधिक राहिले आहे. गेल्या महिन्यात रेल्वेला ११ हजार ९६ कोटी ८९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.७ टक्क्यांनी अधिक आहे. रेल्वेतर्फे माल वाहतुकीसाठी अनेक सवलती दिल्या आहेत. 

रेल्वेमध्ये गेल्या महिन्यात माल भरणे, उत्पन्न आणि वेगासंबंधी मालवाहतुकीचा आलेख चढता राहिला. रविवारी (ता. २८) पाच दशलक्ष टनांहून अधिक मालाचा भरणा झाला आहे. २८ फेब्रुवारीअखेर रेल्वेने ११२.२५ दशलक्ष टन मालवाहतूक केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ती दहा टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या महिन्यात मालवाहतूक गाड्यांचा सरासरी वेग ४६.०९ किलोमीटर प्रती तास इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत तो दुप्पट राहिला. गेल्यावर्षी २३.१७ किलोमीटर तासाच्या तुलनेत २८ फेब्रुवारीला मालगाड्यांचा सरासरी वेग ४७.५१ किलोमीटर तास राहिला आहे. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

विमानाने ३ लाख जणांचा प्रवास 

देशात रविवारी (ता. २८) २ हजार ३५३ विमानांच्या उड्डाणांच्या माध्यमातून देशातंर्गत ३ लाख १३ हजार ६६८ जणांना प्रवास केला. देशातंर्गत २५ मे २०२० ला पुन्हा विमानसेवा सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या प्रवासी संख्येचा हा उच्चांक असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. विमानसेवेला सुरवात झाल्यापासून रविवारपर्यंत (ता. २८) एकुण ४ हजार ६९९ विमानांची उड्डाणे झाली आहे. त्यामाध्यमातून ६ लाख १७ हजार ८२४ जणांना प्रवास केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर २४ मार्च २०२० पासून विमानसेवा स्थगीत करण्यात आली होती.  

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना