कोरोना काळात १०८ रुग्णवाहिका ठरली रुग्णांना आधार 

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोरोना सध्या दुसऱ्या लाटेच्या संवेदनशील टप्प्यावर आहे. या संकटकाळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस लढा देत आहेत. या सर्वांबरोबर जीवनवाहिनी ठरलेली १०८ रुग्णवाहिका अविरतपणे रुग्णसेवा देत आहे. कोरोनाच्या संशयितांची तपासणी करण्यासाठी तसेच संशयितांबरोबर कोरोनाग्रस्तांचे विलगीकरण करण्यात येणाऱ्या सर्वांची ने-आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची सेवा उपयुक्त ठरली आहे. 

जगभर कोरोना पुन्हा एकदा थैमान घालण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली १०८ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे चार हजार १८१ रुग्ण आढळले. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रात उभ्या असलेल्या २० रुग्णवाहिका या संकटकाळात सदैव तत्पर राहिल्या. 
संकटकाळात केवळ आपत्कालीन सुविधेसाठीच नव्हे, तर कोरोनासह नॉनकोविड रुग्णांनाही या रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळाला. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

चालक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात... 

कोरोनाशी लढणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवक जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करत आहे. परिणामी अजूनही कोरोनाशी लढणाऱ्या या यंत्रणेला सर्व घटकांच्या यंत्रणेचा विचार शासनाकडून होताना दिसत नाही. राज्यभरात कोरोना रुग्णांना उपचार देणाऱ्या आणि अहोरात्र झटणाऱ्या १०८ रुग्णवाहिकांमधील डॉक्टर आणि वाहनचालकांना कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नसल्याचे दिसून येते. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोचविण्याचे महत्त्वाचे काम १०८ रुग्णवाहिकने केले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात १०८ रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा राहिला. सेवा अशीच अखंडित सुरू राहिली. 
-डॉ. चेतन काळे (कोविड नोडल अधिकारी, निफाड)