कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये दिरंगाई; रुग्ण धास्तावले! नागरिकांच्या संतप्त भावना

इंदिरानगर (जि.नाशिक) : वडाळा येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात केलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतून प्राप्त होण्यास दिरंगाई होत असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. याबाबत अधिक माहिती घेतली असता ६ मार्चपर्यंत येथे जमा केलेले स्वॅब चाचणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. मात्र, ४ मार्चला तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांचेही अहवाल मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

नमुन्यांचेही अहवाल मिळाले नाही
येथील समन्वयिका संगीता सातपुते यांनीही याला दुजोरा दिला. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. नागरगोजे यांच्याकडे संबंधित माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले असता, ते स्वतः यात नेमकी काय अडचण आहे, याची शहानिशा करत आहेत. दरम्यान, ७ मार्चपासून येथील नमुने जिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी पाठविण्यात येत असून, ते तातडीने मिळण्यास सुरवात झाली आहे. मात्र, यापूर्वी चाचणी केलेल्यांना अहवाल न मिळाल्याने ही सर्व मंडळी धास्तावली आहेत. जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत संपूर्ण कुटुंब काळजीत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तर अनेक जण अहवाल येण्यापूर्वीच थोडे बरे वाटू लागल्याने सर्वत्र फिरत असण्याचीही शक्यता असल्याने त्यातील कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर कोरोनाचा प्रसार होण्याचीही शक्यता आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोणताही त्रास नसला तरी खबरदारी म्हणून ४ मार्चला पत्नी, स्वतः आणि आमचे परिचित अशा सर्वांनी चाचणीसाठी नमुने दिले आहे, मात्र आजपर्यंत अहवाल न मिळाल्याने संपूर्ण कुटुंब तणावात आहे. 
- विजय भावे, ज्येष्ठ नागरिक