कोरोना रुग्णसंख्या वाढीसोबत घटसंबंधी आजपासून ‘वॉच’! फैलावाचे चित्र येत्या दिवसांत होणार स्पष्ट 

नाशिक : शिवजयंती (ता. १९)पासून शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले. कोरोनाच्या लागणविषयक लक्षणांचा पाच दिवसांचा टप्पा आज पूर्ण झाला. त्यामुळे बुधवार (ता. २४)पासून कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीसोबत घटसंबंधी पुढील तीन दिवस आरोग्य यंत्रणा ‘वॉच’ ठेवणार आहे. त्यावरून कोरोनाचा फैलाव वाढणार की कमी होणार, याबद्दलचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल. 

फैलावाचे चित्र येत्या तीन दिवसांत होणार स्पष्ट 

या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार राहिला आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी १६० रुग्ण नव्याने आढळले होते. त्यानंतर प्रत्येक दिवशी अनुक्रमे १२७, १३८, १४५, १५६, १११, १७७, १६५, १५५, १९३ रुग्ण वाढले होते. ११ फेब्रुवारीला दोनशेच्या पुढे दिवसाची रुग्णसंख्या पोचली. त्यादिवशी २०६ आणि दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारीला २९६ रुग्ण आढळले. १३ फेब्रुवारीला १३९ आणि त्यानंतर पुढील प्रत्येक दिवशी अनुक्रमे १६७, २०४, १६०, २०९, २९७ रुग्ण नव्याने पुढे आलेत. १८ फेब्रुवारी २९७ आणि १९ फेब्रुवारीला ३३५, २० फेब्रुवारीला २५२, २१ फेब्रुवारीला ३५२, सोमवारी (ता. २२) २२४, तर आज २७१ रुग्ण आढळलेत. त्याचवेळी रुग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसाला एक ते तीन इतकी सीमित होती. ४ आणि १३ फेब्रुवारीला एकही रुग्ण बरा होऊन घरी गेला नाही. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 
- उपचारासाठी आणल्या क्षणी - २१ 
- एक दिवसाच्या उपचारानंतर - ३८९ 
- दोन दिवसांच्या उपचारानंतर - २३६ 
- तीन दिवसांच्या उपचारानंतर - १९३ 
- चार दिवसांहून अधिक उपचारानंतर - एक हजार २५१ 
- आत्तापर्यंतचे एकूण मृत्यू - दोन हजार ९०  

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले