कोरोना संसर्ग प्रसाराला ‘विंडो पिरिअड’ कारणीभूत; संशोधकांच्या अभ्यासावरून माहिती 

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यापासून लक्षणे आढळण्याचा संक्रमण कालावधी (विंडो पिरिअड) दोन दिवस ते आठवड्यावरून चौदा दिवसांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे प्रसाराची गती वाढली आहे. चायनीज आणि अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शनच्या संशोधकांच्या अभ्यासात हे आढळून आले आहे.

कोरोना संसर्गाला विंडो पिरिअड कारणीभूत

हा विंडो पिरिअड प्रतिकारशक्तीप्रमाणे आढळत असून, जागतिक निष्कर्षानुसार ५.१ ते ११.२ दिवस अशी विविधता विंडो पिरिअडची ९७.५ टक्क्यांपर्यंत निष्पन्न झाली आहे. हुबई शहरात विंडो पिरिअड २७ दिवसांचा आढळून आला आहे. शिवाय जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासात पाच रुग्णांमध्ये विंडो पिरिअड १९ दिवसांचा आढळला आहे. चीनच्या संशोधकांनी ७२ हजार ३१४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला आहे. त्यात ८१ टक्के रुग्णांमध्ये कमी प्रमाणात लक्षणे अथवा लक्षणे नसल्याचे आढळले. १४ टक्क्यांमध्ये श्‍वसनाला त्रास होणे, फुफ्फुसापर्यंत संक्रमण २४ ते ४८ तासांत आढळले. पाच टक्क्यांमध्ये श्‍वसन संस्था बंद होणे आणि अनेक अवयांच्या कार्यांमध्ये अडथळे आल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

आर्थिकदृष्ट्या गरिबांमध्ये कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात

२.३ टक्के रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आणि मृत्यूकडे वाटचाल अशी गंभीर स्थिती निष्पन्न झाली आहे. यावरून प्रतिकारशक्ती व कोर्बिंड यावर विंडो पिरिअडची विविध स्पष्ट होत असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शनच्या संशोधकांनी १७० लाख जणांचा अभ्यास केला आहे. त्यात पुरुष, ज्येष्ठ आणि आर्थिकदृष्ट्या गरिबांमध्ये कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात दिसून आला आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

‘थ्री-सी’ महत्त्वाचा 
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर थंडी वाजून ताप येणे, खोकला, श्‍वसनाला त्रास होणे, गळणे, सर्वांग दुखणे, डोकेदुखी, घसा सुजणे, चव-वास न येणे, नाक चोंदणे, नाक वाहणे, मळमळ, उलटी, जुलाब, कफ निघणे, मानसिक ताणतणाव अशी लक्षणे आढळतात. संशोधकांच्या अभ्यासानुसारच्या विंडो पिरिअडमध्ये खेळती हवा नसताना एकत्र असण्यातील ‘थ्री-सी’ (क्लोज्ड स्पेसेस, क्रॉऊडेड स्पेसेस, क्लोज कान्टॅक्ट सेटिंग) महत्त्वाचा बनला आहे. म्हणजेच काय, तर गर्दीच्या ठिकाणी अनेकांची जवळीक, एकत्रित बसणे आणि गप्पा मारणे अथवा बैठक घेणे, बंद जागेत बराच वेळ घालवणे यातून कोरोना विषाणू संसर्ग प्रसाराची गती वाढत असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांनी म्हटले आहे. 

लक्षणांचा कालावधी (आकडे दिवस दर्शवतात) 
ऋतूप्रमाणे फ्लू (सीझनल फ्लू) : २ 
स्वाइन फ्लू : १ ते ४ 
मर्स (एमईआरएस) : ५ 
सार्स (एसएआरएस) : २ ते ७ 
कोरोना (कोविड-१९) : २ ते १४ (काही रुग्णांमध्ये २ ते २७ आणि २ ते १९) 
(विषाणूने उत्प्रजनन करत हा प्रवास केला आहे. विषाणूचा संक्रमण कालावधी वाढला आहे) 
 

उष्ण अथवा दमट हवामानात कोरोना विषाणू संसर्ग कमी होत नाही. उलटपक्षी प्रसाराची पद्धत सारखीच असल्याचे जागतिक अभ्यासातून निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूने बाधितचा कालावधी प्रतिकारशक्तीप्रमाणे २ ते १४ दिवसांचा आढळून आला आहे. बाधित असूनही लक्षणे तयार झाली नाहीत. अशा लक्षणे नसल्यांकडून प्रसार होऊ शकत नाही, असेही जागतिक संशोधकांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. आहार आणि प्रकृती यावर प्रतिकारशक्ती दिसून येत असल्याचे यावरून स्पष्ट होते. 
- डॉ. विक्रांत जाधव (नाशिक)