”कोरोना स्प्रेडर होण्यापेक्षा कोरोना स्टॉपर व्हा..! एकच ध्येय मनाशी बाळगा”

चांदोरी (जि.नाशिक) : सध्या कोरोना लाट ही पावसातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावतेय.त्यामुळे प्रत्येकाने मी कोरोना स्प्रेडर नाही,कोरोना स्टॉपर आहे हा एकच ध्येय मनाशी बाळगून काळजी घेण्याची गरज आहे.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन

शासनाने कडक निर्बंध लागू केल्यावर बुधवार दिनांक 14 एप्रिलला रात्री 8 वाजे पासून त्याची कडक अंमलबजावणी होत आहे.यामुळे आता संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. खरेतर ग्रामीण गावागावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.मालेगाव आणि निफाड यात आघाडीवर असताना याला ब्रेक करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळेच चेन ब्रेक करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.सध्या तीच आपली प्राथमिकता बनली आहे.असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण मदत कशी करू शकतो हा विचार करा

घरी क्वारंटईन झालेली लोकं आठवड्याच्या आत बाहेर पडून सुपरस्प्रेडर ठरत आहे.बाधित रुग्ण हा दोन आठवडे निरोगी माणसास संसर्ग पोहोचवू शकतो.
मी बरा आहे,मला काही लक्षणं नाही,काहीच त्रास नाही,दम पण लागत नाही,सॅच्युरेशन,ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल आहे अशी आपल्याच मनाला समाधानी करत सुपर स्प्रेडर ची भूमिका बजावतात.प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण मदत कशी करू शकतो हा विचार होणे आता गरजेचे आहे.आपण सुजाण नागरिक असल्याने नियमांचे पालन झालेच पाहिजे.होम क्वारंटाईन रुग्णाने व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चौदा दिवस घरी राहिलचं पाहिजे.सुपरस्प्रेडर हा आपल्या परिवार व समाजासाठी घातक ठरू पाहत आहे.

आकडा आटोक्यात आणायचा आहे
एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी ती काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा आहे.आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोरोना टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे त्याचे कारण ही तितकेच महत्वाचे आहे.आज ग्रामीण भागात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहे. येत्या तीस एप्रिल पर्यंत आपल्याला सर्वांना नियम पळून हाच आकडा आटोक्यात आणायचा आहे हे एकच ध्येय मनाशी ठेऊया तसेच एकसंघ होऊन या महामारीशी लढूया.

काळजी घेणे आवश्यक
मास्क,सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझर हे निरोगी जीवनजगण्याचे औषध झाल्याने एकमेकांचा संपर्क टाळा,अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा,मॉर्निंग व इव्हनिंग वॉक पूर्णपणे बंद करा, मुलांना सार्वजनिक ठिकाणी खेळायला सोडू नका, एकमेकांच्या घरी जाणे टाळा,वृध्दांची काळजी घ्या,वेळोवेळी हात धुवा, यासाठी आपले सर्वांचेच सहकार्य असणे स्वाभाविक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.