
गजानन लोंढे, हिंगोली : भारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी आखाडा बाळापूर येथील सकाळच्या सत्रात फेटे बांधून सहभाग नोंदविला. नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती. (Maharashtra Bharat Jodo Yatra)
कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी शनिवारी साडेसहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे फेटेधारी कोल्हापूरकर स्वागतासाठी सज्ज होते. गुलाबी थंडीत सकाळच्या वेळी रस्त्यावर दुतर्फा यांची भली मोठी रांग पाहायला मिळाली.
तर आमच ठरलयं असे बॅनर्सही त्यांच्या हातात झळकत होते. बसमधून ही मंडळी भल्या पहाटेच येथे दाखल झाली होती. त्यानंतर तेथे सर्वांना फेटे बांधण्यात आले. छत्रपती शाहू महाराज या कर्तृत्वान राजाची पुरोगामी राजा म्हणून ओळख होती. त्यांनी समतेचा विचार दिला. तोच विचार पुढे घेऊन राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. त्यामुळे आम्ही दहा हजार कोल्हापूरकर या यात्रेत सहभागी झाल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेत आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते सामील झाले. यावेळी कोल्हापूर चा वारसा अभिमानाने मिरवणारे कोल्हापुरी फेटे सर्वांनी परिधान केले होते. कोल्हापुरी संस्कृतीचे मानचिन्ह असणाऱ्या कुस्तीचा खेळ, लेझीमचे प्रात्यक्षिक यात्रेत दाखवण्यात आले. pic.twitter.com/YJwZy5JZ6m
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 12, 2022
जहां एकता की ताक़त,
वहीं है भारत!#BharatJodoYatra pic.twitter.com/yGLUWWUbVA— Bharat Jodo (@bharatjodo) November 12, 2022
हेही वाचा
- भारत जोडो यात्रा: राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल; भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार कर्नाटकात
- राहुल गांधींच्या रुपाने आज माझा राजू घरी येत आहे; मुलाच्या आठवणीने रजनी सातवांचा दाटला कंठ
- हिंगोली : राहुल गांधी यांच्या ‘दिदी कैसे हो?’, या प्रश्नाने रस्त्यावर उभे धांडे दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
- Rahul Gandhi In Nanded : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादला : राहुल गांधी
- खा. राहुल गांधी यांच्याकडून आ. सतेज पाटील यांच्या ‘एलईडी स्क्रीन रथ’ चे कौतुक
- Rahul Gandhi : ५२ वर्षाच्या राहुल गांधींचा फिटनेस पाहिला का? त्यांचा चालण्याचा वेग पाहून व्हाल थक्क! (व्हिडिओ)
-
Maharashtra Bharat Jodo Yatra
कुस्तीच्या फडात राहुलजी !
आज भारत जोडो यात्रेत आपल्या कोल्हापूरचे कार्यकर्ते राहुलजींसोबत चालत आहेत. यावेळी @RahulGandhiजीं नी सुरक्षा ताफ्यातून बाहेर येऊन आपल्या कोल्हापुरी कुस्तीचे प्रात्यक्षिक पाहिले.@bharatjodo @INCIndia @INCMaharashtra pic.twitter.com/04t0JGttdO
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 12, 2022
The post "कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील appeared first on पुढारी.