कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराला स्टील, लोखंड चिकटतंय; नाशकातल्या अरविंद सोनारांचा दावा

<p>एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून महाराष्ट्रात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.&nbsp;त्यांचा हा दावा महाराष्ट्र कोविड-19 कृती दलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दावा फेटाळला आहे. "लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही," असं ते म्हणाले</p>