कोविशील्ड लसीमुळे शरीराकडे लोखंड, स्टील आकर्षित होतं, नाशिकमधल्या अरविंद सोनार यांचा दावा; तज्ज्ञांनी दावा फेटाळला

नाशिक : एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून महाराष्ट्रात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जुन्या सिडको परिसरात राहणाऱ्या अरविंद सोनार यांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस 9 मार्च रोजी घेतला होता. त्यानंतर 2 जूनला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस एका खासगी रुग्णालयात घेतला होता. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, असं अरविंद सोनार यांनी सांगितलं. त्यानंतर काल (9 जून) त्यांच्या मुलाने इंटरनेटवर लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचं एक प्रकार बघितला. यावेळी वडिलांमध्ये चुंबकत्व संचारत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांवर तो प्रयोग केला. सुरुवातीला लोखंडाचा पत्रा लावून पाहिला, तो आकर्षित झाला. मग नाणी लावली, त्यानंतर स्टीलच्या वस्तू लावल्या आणि त्या चिकटल्या, असं अरविंद सोनार यांनी सांगितलं. परंतु खासगी डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधला असता याबाबत सांगता येणार नाही असं त्यांना उत्तर मिळालं.

सोनार यांच्यावर दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली असून त्यांना मधुमेहाचाही आजार आहे. हा सर्व प्रकार कशामुळे झाला असावा ही जाणून घ्यायची सोनार यांची देखील इच्छा आहे. माझी तपासणी करुन घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु हा अजब प्रकार सोशल मीडियात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांनी दावा फेटाळला
दरम्यान लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राज्याच्या कोवड-19 कृतीदलाचे सदस्य तात्याराव लहाने यांनी दिली. ते म्हणाले की, "आपण अनेकांना कोविशील्ड लसीचे डोस दिले आहेत. त्यांच्या शरीराला स्टील चिकटत असलं तरी त्याचा आणि लसीचा कोणताही संबंध नाही. शिवाय या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यांच्या शरीराला स्टील तसंच लोखंड चिकटतं. त्याच्या त्वचेला काहीतरी असावं, नाशिकमध्ये त्यांची तपासणी करायला हवी. परंतु याचा आणि लसीचा संबंध लावणं योग्य नाही. कारण लसीमुळे असं काही घडत नाही.

(टीप : अरविंद सोनार यांचा हा वैयक्तिक दावा आहे. त्या दाव्याशी एबीपी माझा सहमत नाही)