खबरदारीचा उपाय म्हणून 19548 आरोग्य सेवकांना लस देणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाला उद्या शनिवार (ता.16) सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी 35 हजार 829 आरोग्य सेवकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 19548 आरोग्य सेवकांनाच लस दिली जाणार आहे. अशी माहीती शुक्रवारी (ता. 15) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

मोहीमेची आवश्यक ती तयारी पूर्ण 

मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात 13 केंद्रावर ही मोहीम राबविली जाणार असून मोहीमेची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. आठवड्यात चार दिवसांत ही मोहीम चालविली जाणार आहे. रोज 1300 याप्रमाणे आठवड्यातील 4 दिवस साधारण 5200 जणांना एकेका केंद्रावर लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात 20742 (सरकारी) 15087 (खासगी) याप्रमाणे 35829 आरोग्य सेवकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली तर त्यांच्यासाठी 43440 डोस उपलब्ध असले तरी एकाचवेळी सगळ्यांना लस दिली जाणार नाही. लसीकरणासाठी वेगवेगळ्या 4 कंपन्याच्या लसी असतील त्यामुळे एकाचवेळी मोठा गोंधळ टाळण्यासाठी हेनियोजन केले आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी मांढरे, जि.प. मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे आदी उपस्थित होते.

दीड महिण्यानंतर कोरोनामुक्ती

पहिल्या लसीकरणानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. त्यानंतर काही दिवस निरीक्षणाखाली रुग्णांना ठेवले जाईल. साधारण दीड महिण्यानंतर रुग्णांना प्रतिकार क्षमता विकसित होउन कोरोनामुक्तीसाठी रुग्णाचे शरीर तयार होईल. असे सगळे लसीकरणाचे नियोजन आहे. 

अफ्टर इफेक्ट नाही

जिल्ह्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक लस उपलब्ध आहे. लसीकरणासाठी रेफ्रीजरेटरची पुरेशी सोय आहे. प्रत्येक लसीकरणावेळी नवीन सुई (सिरींज) वापरली जाईल. ज्यात स्वयंचलितपणे 0.5 मिली. इतकीच लस असेल त्यानंतर आपोआप सिरींज लॉक होईल. संबधित लसीकरणाच्या इम्युनायझेशनमुळे कुठलेही साईड इफेक्ट होणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

- 35829 लसीकरणासाठी नोंदणी
- 43440 जिल्ह्याला लस उपलब्ध
- 19548 प्रत्यक्ष लसीकरण होणार 
- 1300 लसीकरणाचे रोजचे नियोजन 
- 5200 लसीकरण आठवड्याचे नियोजन 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

- लस घ्यायची कि नाही हे ऐच्छिक 
- प्रत्येक डोस 0.5 मिली चा डोस
- मे महिण्यापर्यत लसीचे एक्सपायरी 
- दुसरा डोस 28 दिवसांनंतर देणार
- मेसेज येईल त्यांना लस देणार