खरिपासाठी दोन हजार ३०० कोटींचे कर्जवाटप; गेल्या चार वर्षांतील कर्जवितरणाचा उच्चांक 

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामासाठी दोन हजार ३०० कोटींच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ९५९ कोटी रुपयांनी अधिकचे वितरण झाले असून, मागील चार वर्षांतील हा खरीप पीककर्ज वितरणाचा उच्चांक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

मांढरे म्हणाले, की बैठकीत मागील चार वर्षांचा शेतीकर्जांचा आढावा घेतला. त्या वेळी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पीककर्ज वितरण झाल्याचे आढळले. जिल्ह्यात पीककर्ज वितरणात वाढ झाली असली तरी जिल्ह्यात शेतीची मुबलक कामे असल्याने त्यात वाढीची शक्यता अधिक आहे. तसेच शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून अथवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घ्यावा, ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल व जिल्ह्यातील शेती उद्योगातील प्रगतीत सर्वसमावेशक वाढ होईल. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

बॅंकांनीही एक वास्तववादी लक्ष्य निश्चित करावे, जे जिल्ह्याची पीककर्जाची आवश्यकता, तसेच बँकांना दिलेल्या उद्दिष्टांना प्रतिबिंबित करेल आणि येणाऱ्या आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. हे उद्दिष्ट शाखांची संख्या, प्रसार आणि गतिशीलता, लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी प्रेरित करणारे असावे, असेही मांढरे यांनी सांगितले. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (ता. १५) २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पतपुरवठा योजनेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बॅंकर्सची बैठक झाली. त्या वेळी श्री. मांढरे बोलत होते. या वेळी लीड डिस्ट्रिक मॅनेजर अर्धेंदू शेखर, स्टेट बँकेचे क्षेत्रीय सहाय्यक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पिंगळे यांच्यासह अन्य बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 