खळबळजनक! माहेरहून नाशिककडे निघालेल्या ‘त्या’ मायलेकींचा दुर्दैवी अंत; गोदापात्रात तरंगताना आढळले मृतदेह

म्हसरूळ (नाशिक) : आजारी वडिलांना भेटायला माहेरी आलेली विवाहिता अडीच वर्षांच्या चिमुकलीसह सासरी जायला निघाली. शेजारच्या तरुणाने तिला बसस्थानकात पोहचविले.  घरी पोचल्यावर फोन करते म्हणाली पण तीचा फोन काही आलाच नाही. त्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध सुरु झाला होता.. मात्र घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे..

नेमके काय घडले?

म्हऱ्हळ येथील माहेराहून नाशिककडे येण्यासाठी निघालेल्या ज्योती योगेश राठी (25) व त्यांची मुलगी जिया (वय 3) या मायलेकी दि.4 जानेवारी रोजी नांदूर शिंगोटे येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या घरच्यांनी वावी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर त्या दोघींचा शोध घेण्यात येत होता मात्र  त्या सापडल्या नाहीत. सोशल मिडियावरून या मायलेकींचा फोटोही व्हायरल करण्यात आला होता. या मायलेकींबाबत कमाही माहिती आढळल्यास संपर्कसाठी मोबाइल नंबरही देण्यात आले होते.

पण तेव्हा वेळ वेळ निघून गेली होती.. 

 ता. ७ जानेवारी रोजी ज्योती राठी यांचा मृतदेह नाशिकमधील रामवाडी पूलाजवळ गोदापात्रात तंरगताना आढळला. मात्र त्यावेळी या महिलेची ओळख काही पटली नव्हती. त्यानंतर सात दिवसांनंतर (ता. 14) रोजी जिया या चिमुरडीचाही मृतदेह गांधी तलावात आढळून आला. हे दोन्ही मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

त्या बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी ज्योती यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. हा मृतदेह फुगून वर आलेला होता. पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. गोदापात्रात पाणी सोडलेले असल्याने जियाचा मृतदेह होळकर पूलाखालून गांधी तलावात वाहत गेला होता. गांधी तलावात तिचा फुगलेला मृतदेह एकमुखी दत्त मंदिराच्या समोरच्या बाजूला तलावात तरंगत असल्याचे बोटींग क्लबच्या मुलांना दिसला, त्यांनी पंचवटी पोलिसांना कळवून तो मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच