खाकीच्या मदतीला धावली माणुसकी! अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

बोरगाव (जि.नाशिक) : अपघातात गंभीर जखमी पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीला शिक्षक धावून आल्याने माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. काय घडले नेमके?

खाकीच्या मदतीला धावली माणुसकी!

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बुधवारी (ता. २०) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास नाशिक येथे मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी पंडित आनंदा आहेर (वय ३७, रा. जामुने (भो.) नाशिक शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते सुरगाणा येथून बाजार आटोपून दुचाकीने घरी परतत असताना उंबरठाण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांना मदतीसाठी माधव झिरवाळ यांनी दूरध्वनी केला.

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त जखमी पोलिसाला सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पोचविले. वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कोल्हे, परिचारिका अनिता पोतदार यांनी तत्काळ उपचार केले.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क