खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ, डाळींचा मात्र सर्वसामान्यांना दिलासा

एकलहरे (नाशिक) : कोरोना काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातल्या त्यात आता साखर व डाळी साळींचे दरांनी काहीसा दिलासा दिला आहे.

तेल, तूप, चणाडाळ, बेसन आदी वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाली होती. त्यात तेलाच्या दरात आणखी वाढ झाली आहे. डाळ साखर चे दरात काहीशी घसरण झाल्याने काहीसे समाधानाचे वातावरण आहे. मुंगडाळ, उडीद डाळ चे पीक सप्टेंबर मध्ये येतात. तूरडाळ चे पीक डिसेंबर मध्ये तर चणाडाळ गहूचे पीक मार्च-एप्रिल मध्ये येतात. यंदा मुंग-उडीद, व येणारे तुरीचे  पीक उत्तम असल्याने दरात गत दोन वर्षात जी भाववाढ होती ती यंदा रहाणार नाही.
मुंगचे पीक विदर्भ, मराठवाडा, राजस्थान, ओरिसा तर तुर चे विदर्भात अमरावती, अकोला, मराठवाडात ,सोलापूर, राजस्थान आदी भागात मोठ्याप्रमाणात घेतले जाते. तर तुरडाळीची आयात ऑस्ट्रेलिया, टांझानिया व मुंगडाळ बरमा येथून केली जाते. यंदा डाळींचे उत्पादन चांगले असल्याने गत वर्षीच्या तुलनेत दरात ५ते १५ रुपये किलोमागे कमी राहतील असा अंदाज आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

सध्या डाळींचे क्विंटल चे घाऊक बाजार भाव पुढील प्रमाणे

तुरडाळ ९००० ते १००००,

मुंगडाळ ९२०० ते ९७००,
चणाडाळ ६३०० ते ६७००,
उडीदडाळ९३०० ते १००००
मठ डाळ ९७०० ते ९९००
मसुरडाळ ६६०० ते ६९००

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

यंदा मुंग, तुरीचे पीक चांगले असून गेल्या सिझन मध्ये १२५ ते १३० रुपये किलो तूरडाळ विकली गेली . तिचे दर ८५ ते ९५ पर्यंत डिसेंबर-जानेवारीत येणे अपेक्षित आहे. व इतर डाळींचे दर ही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १५ ते २० रुपये किलोमागे कमी आहेत.
विजय कोठारी ,घाऊक व्यापारी