खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा- संसदेवर झालेल्या हल्ल्याची अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी करणार्‍या 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले. केंद्र सरकारचा हा हुकूमशाही राज्यकारभार असल्याचा आरोप करित धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि धुळे शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करुन येथेही आंदोलन करण्यात आले.

लोकसभेत घुसखोरी करुन हल्ला झाला. त्यामुळे पुन्हा एकदा संसद भवनाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. या हल्ल्याची अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी करणार्‍या 146 खासदारांचे नरेंद्र मोदी सरकारने निलंबन केले. हुकूमशाही पध्दतीने लोकसभा व राज्यसभा खासदारांचे निलंबन करणार्‍या केंद्र सरकारच्या निषेर्धात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळ्यात निषेध आंदोलन करण्यात आले. प्रारंभी धुळे जिल्हा व शहर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी धुळे बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. त्यांनतर धुळे जिल्हाधिकारी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी निषेध नोंदवित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी 146 खासदारांचे निलंबत रद्द करावे अशी मागणी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी खा.बापू चौरे, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, माजी आ.डि.एस.अहिरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, बाजार समितीचे संचालक गुलाबराव कोतेकर, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एन.डी.पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, माजी संचालक राजेंद्र भदाणे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष बापू चौरे, माजी सरपंच सोमनाथ पाटील, ज्येष्ठ नेते मुकूंद कोळवले, वानुबाई शिरसाठ, सरपंच राजीव पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, तालुकाध्यक्ष हरीष पाटील,शकील अहमद,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम भामरे,जि.प.सदस्य अरुण पाटील,संचालक ऋषीकेश ठाकरे, हसन पठाण, दिलीपसिंग गिरासे, प्रल्हाद मराठे, जि.प.सदस्य प्रविण चौरे, विलास पाटील, जावेद देशमुख, सलमान मिर्झा, विश्‍वास बागुल, भावना गिरासे, नरेंद्र पाटील, दिपक पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध appeared first on पुढारी.