खुंटेवाडीकर बंधूंची दक्षिण आफ्रिकेत यशस्वी भरारी! मराठी माणसाच्या स्पप्नासाठी प्रयत्न

देवळा (जि.नाशिक) : अनुभवातून केलेला व्यवसाय हा यशाचे दरवाजे उघडत असतो. खुंटेवाडी येथील भामरे बंधूंनी दक्षिण आफ्रिकेत नोकरी करताना तेथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे स्वतः अनुभवत पर्यटन क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

खुंटेवाडीकर बंधूंची पर्यटनक्षेत्रात भरारी

मराठी माणसाचे पर्यटनाचे स्वप्न मराठी माणसासोबत पूर्ण व्हावे, हा हेतू समोर ठेवत ‘ड्रीम हॉलिडे’ संकल्पना पुढे आणली आहे. विशेष म्हणजे त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने खुंटेवाडीकर तरुणांची पर्यटनक्षेत्रातील भरारी तरुणांना प्रेरणादायी आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या सचिन व कुशल भामरे या भावंडांनी जवळपास दहा वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या विविध शहरांत नोकरी केली. तेथील अटलांटिक व हिंदी महासागरांचे स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, तेथील संस्कृतीने आकर्षित होत ते सुटीच्या कालावधीत याचा आस्वाद घेत राहिले. या कालावधीत त्यांनी तेथील सामाजिक जीवन, संस्कृती, राहणीमान, व्यवसाय, इतिहास जाणून घेत प्रेक्षणीय पर्यटनस्थळांची ओळख करून घेतली. या देशातील पर्यटन निश्चितच इतर देशांतील पर्यटकांना आवडेल, याची खात्री पटल्याने भामरे बंधूंनी पर्यटन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

दक्षिण आफ्रिकेत ‘ड्रीम हॉलिडे’ संकल्पना 
या देशातील व्यावसायिकांशी मोठा संपर्क, पर्यटकांचे आदरातिथ्य, पर्यटनाचे पूर्ण समाधान करण्याचे कौशल्य, मराठी, इंग्रजी व आफ्रिकन भाषेतील समन्वयामुळे भारतीयांसह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया खंडातील अनेक पर्यटकांना त्यांनी दक्षिण आफ्रिकेची यशस्वी सफरी घडवून आणली. पर्यटकांना परवडतील अशा वैविध्यपूर्ण टुर्स ते आयोजित करत असतात. यात ग्रुप टुर्स, फॅमिली टुर्स, हनिमून टुर्स, सीनिअर सिटिझन टूर्स, ॲडव्हेंचर टुर्स अशा टुर्सचा यात समावेश आहे. राज्यातील मराठी भाषिकांना दक्षिण आफ्रिकेचे दर्शन घडवून आणण्यासाठी ते नेहमीच उत्साही असतात. त्यासाठी ९९२३९५७८९० या मोबाईल नंबरवर किंवा http://www. skyglobals.com/Dream Holidays.html यावर आपण संपर्क साधू शकता. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

 

जगातील अद्‍भुत, निसर्गरम्य व स्वप्नवत पर्यटनस्थळांना भेट देण्याची अनेकांची इच्छा असते. जवळचा मराठी भाषिक कुणी मार्गदर्शक नसल्याने इच्छापूर्ती अपूर्ण राहते. आपली इच्छा आणि आमची साथ यातून आपण निश्चितच पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. 
-सचिन भामरे, संचालक ड्रीम हॉलिडेज 

 

कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडल्या असल्या तरी आता पर्यटनाची आस लागली आहे. ‘ड्रीम हॉलिडे’च्या माध्यमातून आम्ही दक्षिण आफ्रिकेतील पर्यटन केले आहे. एक वेगळा आनंद व सुखद अनुभव यातून आम्हास मिळाला. 
-रमेश वाघ, बांधकाम व्यावसायिक, नाशिक