खुशखबर! बोधचिन्ह अन् घोषवाक्य मिळवून देणार आकर्षक बक्षीस; कसे ते वाचा

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान अखेर नाशिकला मिळाला आहे. शहरात होणा-या या तिस-या साहित्य संमेलनासाठी प्रथमदर्शनी ओळख होण्यासाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. 

असे आहे स्पर्धेचे नियम

९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथम दर्शनी होते ती त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य यांनी. यंदा नाशिक जिल्हा निर्मितीला १५१ वर्षे पूर्ण होत आहे. तेव्हा गोदेकाठी होत असलेले या संमेलनात शहराचा अभिमान, इतिहास आणि कर्तुत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी ह्या निमित्ताने मिळत आहे. हे सर्व एका बोधचिन्ह आणि घोषवाक्यात उमटावे अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सदर घोषवाक्य मोजक्या शब्दात आणि मराठीतच असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी असावे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक

येत्या ८ जानेवारी पर्यंत बोधचिन्ह आणि घोषवाक्य जमा करायचे आहे. कोणीही १८ वर्षांवरील भारतीय नागरिक, व्यक्ती, समूह स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. चार चौरस सेमीमध्ये चिन्ह बनवायचे आहे. abmss94.nashik@gmail.com या मेल आयडीवर बोधचिन्ह जेपीईजी, जेपीजी, पीएनजी या फॉरमॅटमध्ये पाठवायचे आहे. स्पर्धकाने स्वत:ची संपुर्ण माहिती फोटोसह मेल करायची आहे. निवड झालेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य याचे संपुर्ण हक्क आयोजकांकडे सुरक्षित असणार आहेत. विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार