खुशखबर! सरकारी कामासाठी ऑफिसमध्ये जाण्याची नाही कटकट; घरबसल्या मिळणार 86 सेवा

नाशिक : जिल्ह्यात उद्या मंगळवार (ता.26) प्रजासत्ताकदिनापासून प्रशासकीय कामकाजासाठी महसूल यंत्रणतर्फे ई ऑफीस प्रणाली सुरु होणार आहे. त्यात, पहिल्या टप्प्यात प्रमुख विभागाचे कामकाज ऑनलाईन होईल. त्यामुळे कुठल्या टेबलावर फाईल अडून राहील हे वरिष्ठांच्या लक्षात येउन त्वरीत त्या अडवणूकीवर कार्यवाही करणे सोपे होणार आहे. पारदर्शकता व कालमर्यादेत कामाला गती येणार आहे.

शासकीय कार्यालयात नागरिकांना चकरा माराव्या लागू नये यासाठी ऑनलाईन ई ऑफीस कार्यालय ही प्रणाली आहे. त्यानुसार कार्यालयातील प्रत्येक फाईल ऑनलाईन नोंद होउन सगळ्या कागदपत्रांचे स्कॅनींग होउन त्या त्या विभागाला पाठविली जाईल. त्यामुळे कुठल्या विभागाकडे किती प्रकरण प्रलंबित आहे. याचे स्पष्ट होणार आहे. त्यानुसार त्या त्या विभागाकडे प्रलंबित प्रकरणाचा पाठपुरावा करता येणार आहे. विभागप्रमुखांना त्याविषयी लागलीच कल्पना येणार आहे. फायली अडवणूकीचे प्रकार टाळण्यास मदत ठरणारी ही प्रणाली उद्यापासून सुरु होणार आहे.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

नाशिक मित्र पोर्टल

नाशिक मित्र हे आणखी एक पोर्टल सुरु होईल. नाशिक जिल्ह्याच्या संकेतस्थळावरुन त्यावर जाता येणार आहे. राज्यात सध्या सेवा हमी कायद्यार्तंगत 20 सेवा दिल्या जातात. मात्र, नाशिकला 20 जानेवारी 2019 पासून 81 सेवा डिजीटल स्वरुपात दिल्या जातात. राज्य शासनाने 20 सेवांची हमी दिली असतांना, जिल्ह्यात वर्षापासून 81 सेवांची हमी दिली आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या या सेवा हमी उपक्रमाचे राज्याचे सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यांनी गौरव केला आहे. त्यात उद्यापासून आणखी 5 सेवांची वाढ करुन 86 सेवा डिजीटल स्वरुपात दिल्या जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्जाद्वारे नागरिकांना या सेवा मिळविता येणार आहे.

नागरिकांना ऑनलाईन दाद मागण्याची सेवा सोय आहे.तसेच सेवा देण्यास दिरंगाई केल्यास संबधिताला दंडाची तरतूद आहे. सध्याची प्रणाली ऑफलाईन आहे. जी उद्या प्रजासत्ताकदिनापासून ऑनलाईन पध्दतीने 86 सेवा डिजीटल स्वरुपात दिल्या जातील कोरोना काळात प्रवासाला परवानगी देणारे ई पास याच प्रणालीद्वारे दिले जात.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच