खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला

जळगाव क्राईम,www.pudhari.news

जळगाव : मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बापाने थेट न्यायालय परिसरातच संशयितांच्या हत्येचा कट रचला. संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाल्याने मयत तरुणाचे वडिल महिलेचा बुरखा घालून पिस्तोल घेवून आला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद येथे २१ सप्टेंबर २०२२ रोजी धम्मप्रिया सुरळकर याचा खून झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीना आज कोर्टात हजर केले जाणार होते. याची माहिती मयत तरुणाच्या वडिलांना मिळाली होती. तोच बदला घेण्यासाठी बापाने मुलाच्या मित्रासोबत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेचा बुरखा परिधान करीत जळगाव गाठले. पर्समध्ये गावठी पिस्तोल व ५ जिवंत काडतूस घेत तो एका मंदिरावर बसला होता. वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी त्याची चौकशी केली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला हत्येचा डाव

यावेळी पोलिसांना त्याचा संशय आल्याने ताब्यात घेवून शहर पोलिसात आणले असता त्याने सर्व कबुली दिली. जळगाव शहर पोलिसांनी मनोहर आत्माराम सुरळकर (वय ५०, रा. पंचशील नगर, भुसावळ) याला अटक केली. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहरने दिली आहे. शहर पोलिसांच्या पथकामुळे त्याचा डाव उधळून लावण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून चौकशीला सुरूवात केली आहे.

हेही वाचा : 

The post खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला appeared first on पुढारी.