खोकरी गैरव्यवहारप्रकरणी सरपंचांसह तिघांचे पद रद्द; नागरिकांकडून शासनाकडे तक्रारी

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील खोकरी ग्रामपंचायतीत विकासकामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सरपंच यमुना गवळी यांच्यासह इतर तीन ग्रामपंचायत सदस्यांचे पद अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी रद्द केले आहे. या प्रकरणी काही नागरिकांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. यावरून हा निकाल देण्यात आला. 

नागरिकांकडून शासनाकडे तक्रारी
खोकरी येथील सरपंच यमुना गवळी यांनी शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून उन्हाळ्यात गावास पाणीपुरवठा करण्याचा ठेका स्वत:चे पती चिंतामण गवळी यांनाच दिला होता. याशिवाय गावात रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा ठेकाही पतीलाच दिला होता. या कामाच्या मोबदल्यात चिंतामण गवळी यांना लाखोंची रक्कम अदा करण्यात आली आहे. पतीच्या नावानेच बँक खात्यातून धनादेश वठविण्यात आले. खोकरी गावात चौदावा वित्त आयोग व पेसा योजनेतून विविध विकासकामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सदस्या जयश्री धूम, पंडित बोरसे, मधुकर चौधरी यांचेही पद रद्द करण्यात आले.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांचा आदेश 

अनेक नागरिकांनी याबाबत मागणी केली होती. त्यामुळे सरपंचांसह इतर तीन सदस्यांचे याच कारणामुळे पद रद्द करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिला. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!