गंगापूर धरणातून गोदावरीत 500 क्युसेकनं विसर्ग, पाणीचंटाईला सामोरं जाणाऱ्या नाशिकसाठी दिलासा

<p>एकीकडे&nbsp;नाशिक&nbsp;शहरात पाणीकपात सुरु असतांनच&nbsp;दुसरीकडे शहराची तहान भागवणारे गंगापूर धरण 78 टक्के भरल्याने तसेच धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने आजपासून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलाय. सकाळी 10 वाजता 500 क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खरं तर जुलै महिन्याची पंधरा तारीख उलटूनही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती आणि यामुळे चिंता व्यक्त केली जात होती मात्र गेल्या आठवडाभरापासून अनेक भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरणसाठा 48 टक्के झाला आहे. सध्या गंगापूर, नांदुरमध्यमेश्वर, दारणा, वालदेवी आणि भावली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.</p>