गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल! किमतीत दुपटीने वाढ

नरकोळ (जि.नाशिक) : उन्हाच्या झळा चांगल्या जाणवू लागल्या आहेत. नागरिकांना थंड पाण्याची गरज भासू लागली आहे. दर वर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात दाखल झाला असून, यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.

गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल

तरीही यंदा माठांच्या किमती स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनविण्यासाठी मग्न असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरिबांना आवाक्याबाहेर असल्याने मातीच्या माठांना फ्रीज मानून तहान भागवितात. मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात मागणी असते. माठ विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

रंगीबेरंगी माठांना घेण्याचा नागरिकांचा कल

बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याचे मठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली. त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. माठातील शुद्ध पाणी आरोग्याला चांगले ठरते. दोन-तीन वर्षांपासून चिनी मातीच्या रंगीबेरंगी माठांना घेण्याचा नागरिकांचा कल वाढलेला आहे. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

माठांचे भाव (रुपयांमध्ये) 
सर्वांत लहान ः १०० 
मध्यम माठ ः २०० ते २५० 
मोठा माठ ः ३०० ते ४०० 
माठासाठी प्रसिद्ध गावे ः मुंजवाड, नामपूर, सटाणा, जायखेडा, डांगसौदाणे, कळवण 

 

गत वर्षीपेक्षा यंदा उन्हाळा जास्त कडक राहील. त्या मुळे मोठ्या प्रमाणात माठ बनविण्यात आले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ असली तरी या वर्षी भाव स्थिर आहेत. या व्यवसायाला आता उतरती कळा लागली आहे. 
-संजय सोनवणे, व्यावसायिक, सटाणा