“गिरणा धरणातून स्थानिकांना मच्छिमारी करू द्या”,मच्छिमारांसह प्रहार संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

<p>गिरणा धरणातून स्थानिकांना मच्छीमारी करू द्यावी, धरणावरील ठेकेदाराकडून मच्छीमारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, मे.ब्रिज कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, गिरणा धरण प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक मच्छीमार यांना धरणावर रोजगार उपलब्ध करून घ्यावा या मागणीसाठी आज मच्छीमारांसह '&nbsp;प्रहार&nbsp;' संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा जुन्या तहसील कार्यालायसमोरून नवीन प्रशासकीय संकुलातील तहसील कार्यालयावर नेण्यात आला.पोलिसांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा मोर्चा अडवण्यात आला. या मोर्चात गिरणा धरण प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक मच्छीमार हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.</p>