
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. परंतु ही सुरक्षा आपल्याला नको असं म्हणत महाजनांनी सुरक्षा नाकारल्याचं पोलीस महासंचालकांना कळवलं आहे.
याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले आहे. या पत्रात महाजन यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर असते. मात्र राज्यातील पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरिल वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत आपण या पत्राची दखल घेत संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत असे मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस महासंचालक यांना पाठवलेल्या पत्रातून मागणी केली आहे.
हेही वाचा :
- Samruddhi Kelkar : तुझ्या नजरकैदेत मला जन्मठेपेची शिक्षा होऊ दे! समृद्धीच्या सौंदर्याचे चाहत्यांना वेड
- Nashik Crime : कॉलेज जवळ पिस्तूल घेऊन फिरत होता, पोलिसांकडून अटक
- पुणे बंद : नुपुर शर्मा सारखी तत्काळ कारवाई राज्यपालांवर करा; खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी
The post गिरीश महाजनांनी नाकारली अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा; पोलीस महासंचालकांना पत्र appeared first on पुढारी.