गुड मॉर्निंग ठरली बॅड मॉर्निंग! मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाची ‘डेथबॉडी’च परतली; पिंपळगाव बसवंतची दुर्दैवी घटना

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : शारीरिक तंदुरुस्तीसाठी वैभव दररोज मॉर्निंग वॉकला मित्रांसमवेत तीन महिन्यांपासून जात होता. शिवाजीनगरपासून महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने टोलनाक्यापर्यंत पायी जाण्याचा त्याचा नित्यक्रम होता. पण त्या दिवशी असे काही घडले की त्याचा मृतदेहच घरी परतला, या घटनेने नागरिकांनाही धक्का बसला आहे.

गुड मॉर्निंग ठरली बॅड मॉर्निंग

शुक्रवारी (ता. २९) सकाळी साडेसहाला रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ ही दुर्घटना घडली. शारीरिक तंदुरुस्तीसाठी वैभव राजेंद्र दायमा (वय २४, रा. शिवाजीनगर, पिंपळगाव बसवंत) दररोज मॉर्निंग वॉकला मित्रांसमवेत तीन महिन्यांपासून जात होता. शिवाजीनगरपासून महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने टोलनाक्यापर्यंत पायी जाण्याचा त्याचा नित्यक्रम होता. शुक्रवारी रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ येताच भरधाव येणाऱ्या बसने वैभवला जोरदार धडक दिली. वैभवच्या शरीरावरून बसचे चाक केल्याने पोट व डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. वैभव इमामी कंपनीत सेल्स ऑफिसर होता. त्याच्यासोबतचा राकेश बाळासाहेब वाघाले गंभीर जखमी झाला असून, सोमनाथ गायकवाड वाचला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात घडल्यानंतर बसचालकाने धूम ठोकली. या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, बसचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे तपास करीत आहेत. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

बसचालकांच्या मुजोरीचा बळी… 
पिंपळगाव बसवंत येथे महामार्गाच्या सर्व्हिस रोडला मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला भरधाव बसने चिरडले.महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या बसचालकांच्या मुजोरीची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. समोरच्या वाहनचालकांची कोणतीही चूक नसताना बेफाम बसचालकांमुळे अनेक अपघात घडले आहेत. अशा मुजोर चालकांमुळेच आज एका तरुणाचा बळी गेला. त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल