जळगाव प्रतिनिधी – नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवून उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्याला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर असलच असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले.
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचा स्वागत व सत्कार विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. आर. धनगर, शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय सहसचिव एस एस अहिरे, इशतू संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक डॉ. संजीव भटकर, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक मंडळाचे सहसचिव सुनील वानखेडे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव आर के पाटील, मनोज खडसे आदींनी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यात नव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावरती सर्वांच्या मदतीने प्रयत्न करण्यातअसल्याचे म्हंटले आहे.
हेही वाचा –
- भीमा नदीपात्राला जलपर्णीच्या बेड्या; नदीकाठचे ग्रामस्थ दुर्गंधीमुळे त्रस्त
- ‘शक्ती’ नष्ट करणारे आणि ‘शक्ती’ची पूजा करणाऱ्यांमध्ये खरी लढाई : PM मोदी
- अजित पवार इतके तडफडत का आहेत? ते बारामतीत निवडून येणे अशक्यच : विजय शिवतारेंचा आक्रमक निशाणा
The post गुणवत्ता पूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार- कल्पना चव्हाण appeared first on पुढारी.