गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदाराने मागितली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

नाशिक : गुन्ह्यात मदत करण्यासाठी सोनवणे याने मंगळवारी (ता ८) तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच मागणे पडले महागात

सासरच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात मदतीसाठी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच बुधवारी (ता ९) दसक पोलिस चौकीत बी. डी. सोनवणे या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 
पळसे (ता. नाशिक) येथील एका विरोधात त्याच्या पत्नीने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सोनवणे याने मंगळवारी (ता ८) तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून बुधवारी दसक पोलिस चौकीत तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने सोनवणे यांना पकडले. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले