गृहमंत्र्यांना महिन्याला शंभर कोटी तर ‘वर्षा‘ ला किती? किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

नाशिक : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना महिन्याला शंभर कोटी मिळतं होते तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा‘ ला किती असा शाब्दीक हल्लाबोल भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. गृहमंत्री देशमुख यांना क्लिनचिट देणाया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाची चेष्टा करू नये असे सांगताना सचिन वाझे प्रकरणाची फाईल मंत्रालयातून गायब झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

भाजप कार्यालयात किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महापालिका आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. परमवीर सिंग खोटे बोलतं असल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. गृहमंत्री देशमुख खरे बोलतं असतील तर राज्य सरकारने परमवीर सिंग यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. मात्र तसे होणार नाही त्याला कारण म्हणजे चौकशीत अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. सचिन वाझे प्रकरणाची फाईल मंत्रालयातून गायब झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. वाझे यांच्या अनेक बेनामी कंपन्या आहेत. त्यामुळे एनआयए सोबतच ईडी, इनकम टॅक्स व कंपनी व्यवहार मंत्रालयानेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारला महावसुली सरकार संबोधताना परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी टिका केली. ते म्हणाले, राज्याचे गृह, गृह निर्माण खाते शिवसेनेचे मंत्री अनिल परब हेचं चालवतात. वाझें यांच्याकडे अनेक प्रकारची वाहने होती ती वाहने कोण वापरत होते हे अनिल परब यांनी शोधून काढावे.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

मुख्यमंत्र्यांचे कोव्हीडकडे दुर्लक्ष

राज्यात सर्वाधिक कोव्हीडचे रुग्ण राज्यात आहे. परंतू मुख्यमंत्र्यांना या परिस्थितीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. केंद्र सरकारने राज्यासाठी ७२ लाख डोस दिले. त्यापैकी फक्त ४० लाख डोस देण्यात आले. लस उत्पादनासाठी राज्य सरकार परवानगी मागतं आहे. शंभर कोटी रुपये मंजूर असलेले लिक्विड ऑक्सीजन प्लॅन्ट राज्यात अद्याप उभे राहिलेले नाही. वीज जोडणी तोडल्याने एका शेतकऱ्यांनं आत्महत्या केली. शेतकरी व कोव्हीड या दोन्हींकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा