गृहिणींचे बजेट कोलमडले! खाद्यतेलांच्या किमतीत वाढ; आयात शुल्कवाढीचा परिणाम 

बिजोरसे (जि.नाशिक) : सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल सरकी, पामतेलाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. तसेच आयात शुल्कात वाढ करण्यात आल्याने खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

गृहिणींचे बजेट कोलमडले
बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ पुढील एक ते दोन महिने कायम राहण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांकडून स्वयंपाकासाठी तसेच प्रक्रिया उद्योगातही पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पामतेलाची किंमत जवळपास १३० रुपये झाल्याने सामान्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन तेलाचा दर १३५ रुपये प्रतिकिलोवर पोचला आहे. अवघ्या दोन महिन्यांत सोयाबीनच्या दरात ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या तेलाची किंमत १३५ रुपये प्रतिकिलो झाली आहे. यंदा देशात सोयाबीन आणि कच्च्या तेलाची आयात ७० टक्के गेली आहे. केंद्र सरकारने आयात खर्च वाढल्याने देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

किमतीत वाढ का? 
भारतात सर्वसाधारणपणे ७० टक्के खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते. ३० टक्के भारतात तयार होते. यंदा कोरोना संकटामुळे अन्य देशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प झाली होती. केंद्र सरकारला पामतेलावरील आयात शुल्क आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर झाला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणामही खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

किरकोळ बाजारातील दर (प्रतिकिलो रुपयांमध्ये) 
सोयाबीन- १३० 
सूर्यफूल- १३५ 
सरकी- १२० 
पाम - १३० 
शेंगदाणा - १५० 

सरकारने आयात शुल्क वाढवले ते कमी करणे गरजेचे आहे. लॉकडाउनमुळे ही किंमत वाढली आहे. 
- भालचंद्र बधान, किराणा व्यापारी, नामपूर