जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत.
शालेय दशकापासून ते राजकीय कारकीर्द असलेल्या स्मिता वाघ यांची सुरुवातच विद्यार्थी परिषदे पासून झालेली आहे. त्यांना आज खासदारकीचे तिकीट जाहीर झाले आहे. त्यांचे पती व त्यांनी भाजपा पक्षासाठी विद्यार्थी दशकापासून काम केलेले आहे. त्याचे फलश्रुत म्हणून गेल्या वेळेसही त्यांना लोकसभेचे तिकीट जाहीर होऊन ऐनवेळी तिकीट कापले गेले होते मात्र यावेळेस पुन्हा त्यांचे नाव जळगाव लोकसभेसाठी घोषित झाले आहे. गेल्यावेळेला संधी हुकली मात्र यावेळेला ती मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील सक्रीय राजकारणात पती-पत्नी म्हणून उदय बापू वाघ व स्मिता वाघ यांचे नाव घेण्यात येते. कॉलेजच्या विद्यार्थी दशकापासून दोघेही पतीपत्ती राजकारणात सक्रीय होते. दिवंगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ हे जि प सदस्य व मार्केट कमिटी यावर निवडून आलेले होते. त्यांच्याबरोबर सहचरणी म्हणून राजकारणात त्यांच्या बरोबरीने आलेल्या स्मिता वाघ या जिल्हा बँकेवर तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. मार्केट कमिटी वर निवडून आलेल्या आहेत तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून आलेल्या होत्या. याचबरोबर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा ही सांभाळली होती. त्या विधान परिषदेवर जळगाव मधून निवडून गेलेल्या होत्या. प्रदेशावर महिला आघाडीची त्यांनी धुरा सांभाळली आहे. विद्यार्थी परिषद भारतीय जनता पार्टी असा प्रवास करताना त्यांनी विविध आघाड्यांवर आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार म्हणून स्मिता वाघ यांचे पहिल्या यादीत नाव जाहीर झाले होते. त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवाती देखील केली होती. त्यांचे कार्यकर्तेही त्यासाठी कामाला लागले होते. मात्र ऐनवेळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणात उन्मेश पाटील यांना तिकीट जाहीर झाले होते. मात्र तरीही त्यांनी आपली नाराजी व्यक्त न करता नवीन भाजपाच्या उमेदवाराबरोबर येऊन अर्ज दाखल केला होता.
आपल्या कामातून सातत्य दाखवून त्यांनी भाजपाशी नेहमीच जुळून घेतलेले होते. दिवंगत जिल्हाध्यक्ष उदय बापू यांच्या निधनानंतरही त्यांनी पक्षाचे काम चालूच ठेवले होते. आज त्याच कामाची पावती म्हणून त्यांना पुन्हा जळगाव लोकसभेचे तिकीट जाहीर झाले आहे.
अमळनेर हा भाजपाच्या दृष्टीने कमकुवत राहिलेला एक तालुका आहे. या तालुक्यात अपक्ष उमेदवार आमदार बनतात राष्ट्रवादी ने या ठिकाणी बाजी मारलेली आहे. नामदार अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.
हेही वाचा :
- भाजपच्या दुसऱ्या यादीतील पाच महिला उमेदवारांची नावे चर्चेत
- प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा | Rahul Gandhi Dhule
- Nagpur Fire News: नागपूरमधील बायोडायव्हर्सिटी पार्कला आज पुन्हा आग
The post गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी appeared first on पुढारी.