गोदाघाट परिसरातील चार बोटी जळून खाक; दहशत माजविण्याचा प्रयत्न 

पंचवटी (नाशिक) : बुधवारी (ता.24) पहाटेच्या सुमाराला रामकुंड येथील गांधी तलावात उभ्या चार बोटींना आग लावून पेटवून दिल्याची घटना समोर आली. या बोटीला लाकुड आणि प्लॅस्टिक वापरलेले असल्याने काही वेळातच या बोटींचा जळून कोळसा झाला. पण हे कृत्य करण्यामागे कोणाचा हात आहे. याचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे. 

चार बोटींना आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार

हे ठिकाण धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने शेकडो भाविक देवदर्शनासाठी गंगाघाटावर दररोज येतात. नदीपात्रात असलेल्या वाहत्या पाण्यात बोटींच्या माध्यमातून पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेत असतात. याबाबत महापालिकेने ए्का ठेकेदाराला ठेका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत कामे गोदाकाठालगत सुरू असल्याने नौकाविहार बंद करण्यात आले आहे. ठेकेदाराने त्याच्या ताब्यातील त्या चार बोटी गांधी तलावात कोपऱ्यात उभ्या करून ठेवल्या आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञातांनी गांधी तलावात येऊन उभ्या चार बोटींना आग लावून त्या पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

पूर्ववैमनस्यातून प्रकार घडल्याची चर्चा

प्रकार समजताच तेव्हा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची पाहणी केली. याप्रकरणी दुपारी उशीरापर्यंत कोणीही तक्रार नोंदविण्यासाठीपुढे आले नव्हते असे पोलिसांनी सांगितले. या जाळपोळीमागे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पूर्ववैमनस्यातून चारही बोटी जाळल्याची गोदाकाठावर चर्चा आहे.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ