गोदावरी एक्स्प्रेस मनमाडऐवजी धुळ्याहून सोडण्याचा घाट; मार्ग बदलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक रोड : नाशिक जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीत महत्त्वपूर्ण असणारी गोदावरी एक्स्प्रेस आता मनमाडऐवजी धुळ्यावरून सोडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत प्रवासी संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गुरमीतसिंग रावल यांनी सांगितले, की रेल्वे प्रशासनाशी बोलून गाडीचा मार्ग न बदलण्याची मागमी करणार आहे. मात्र प्रशासनाने गाडीचा मार्ग बदलला, तर दिल्लीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच खासदार गोडसे यांनी दिला आहे. गोदावरी एक्स्प्रेस आर्थिकदृष्ट्या तोट्यात असल्याचे रेल्वेकडून सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गाडी काही दिवस बंद होती. आता ती मनमाडऐवजी धुळ्यातून सोडण्याचा घाट घातला जात आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

गोदावरी महत्त्वाची गाडी 

नाशिक जिल्ह्यासाठी गोदावरी महत्त्वाची गाडी आहे. रोज या गाडीने मनमाड, नाशिक रोड, इगतपुरीसह जिल्ह्यातील चाकरमाने मुंबईला जातात. उद्योग व्यावसयिकांच्या वेळा साधणारी ही गाडी महत्त्वाची आहे. तिचा मार्ग बदलला गेल्यास जिल्ह्यातील प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

गोदावरी गाडी आहे त्याच मार्गावर चालविण्यात यावी, ही गाडी जर दुसऱ्यामार्गे वळवली, तर प्रवासी संघटना रेल्वेस्थानकावर तीव्र आंदोलन करतील, यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनाही सांगितले असून, ते वरिष्ठ विभागाशी बातचित करीत आहेत. 
- गुरमितसिंग रावल, अध्यक्ष, प्रवासी संघटना