गोदेच्या पूररेषेत काँक्रिटची भिंत; स्मार्टसिटी कंपनीची दुटप्पी भूमिका संशयास्पद

नाशिक : स्मार्टसिटी प्रशासनातर्फे एका बाजूला गोदावरी नदीपात्रातील काँक्रिट काढले जात आहे आणि दुसऱ्या बाजूला नदीपात्रात काँक्रिट टाकले जात आहे, ही दुटप्पी भूमिका संशयास्पद आहे.

कोणत्याही विभागाची परवानगी न घेता पूररेषेत सिमेंटची भिंत बांधणाऱ्या स्मार्टसिटी प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी व तातडीने नदीपात्रात बांधलेल्या काँक्रिटची भिंत काढून टाकावी. झालेला संपूर्ण खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करावा, अशी मागणी याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी केली आहे. 

निळ्या पूररेषेत बांधकाम करण्यास मनाई

उच्च न्यायालयाने विशेषाधिकार दिलेल्या विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समितीकडे तक्रार केली आहे. त्यात, पाणवेलीसंदर्भात दीड वर्ष झाले. मात्र, नाशिक महापालिकेने नोटीस देऊन अद्यापही संबंधित ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही. कारवाई केली जाणार आहे की नाही याविषयी माहिती मिळावी. टाळकुटेश्वर पूल येथील वाघाडी नाल्यातून लाखो लिटर गटारीचे सांडपाणी गोदावरी नदीत सोडले होते. या संदर्भात महापालिकेकडे तक्रारही केली. त्यानंतर महापालिकेने प्रथम अज्ञात व्यक्ती व नंतर ठेकेदाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाने गोदावरी नदीपात्रात निळ्या पूररेषेत बांधकाम तसेच काँक्रिटीकरण करण्यास मनाई केली आहे. स्मार्टसिटी प्रशासनाने अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ गोदावरी नदीपात्रात निळ्या पूररेषेमध्ये बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी न घेता काँक्रिटची भिंत बांधून नदीपात्रात अतिक्रमण करून नदीपात्र अरुंद करण्याचे काम केले आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करून तो खर्च जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करावा. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच