देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा– बिर्याणीत गोमांस वापरल्याप्रकरणी पोलिस कारवाई झाल्यानंतरही पुन्हा नाव बदलून तोच धंदा थाटणाऱ्याला मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिस आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने दणका दिला आहे. हे दुकान सील करण्यात आले आहे.
येथील बाजार परिसरात असलेल्या साबरी दरबार या बिर्याणी पॉईंट दुकानात गोमांस विक्री आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली होती. नसीम जफरखान (३०, रा. उत्तर प्रदेश) या अटक झाली होती. नंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली. या दरम्यान, त्याच्या दुकानाचे नाव बदलून पुन्हा व्यवसाय सुरू झाला. कारवाईनंतर हे दुकान बंद करण्याबाबत पोलिसांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला लेखी सूचना दिल्या होत्या. तरी दुकान राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांची भेट घेत कारवाईला दिरंगाई का होत आहे, अशी विचारणा करत प्रशासनाला धारेवर धरले. याची दखल घेत कॅन्टोन्मेंट प्रशासनाने पोलिस संरक्षण घेत मस्जिद स्ट्रीटवरील त्या दुकानाला सील केले. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे, तालुकाध्यक्ष नितीन काळे, शहराध्यक्ष संदीप चौधरी, प्रवीण मस्के, नवनाथ झोंबाड, अक्षय कलाल, विजय गव्हाणे, सचिन गोडसे, विक्रम कडाळे, राहूल गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- ठाणे: मुंब्रा येथे पोलिसाला चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांची धिंड
- Israel-Gaza war : अन्न मदत घेण्यासाठी आलेल्या ११२ जणांचा मृत्यू, ७५० हून अधिक जखमी, गोळीबाराचा आरोप इस्रायलने फेटाळला
- आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाचा झटका, शिक्षा माफीची याचिका फेटाळली
The post गोमांस विक्री करणाऱ्याची चलाखी, नाव बदलून पुन्हा थाटला तोच धंदा appeared first on पुढारी.