गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून जिल्हा बंदी करा ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

गौतमी पाटील,

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकमध्ये काल पहिल्यांदाच प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा लावलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या दोन छायाचित्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत छायाचित्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर गौतमी पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांच्याकडे केली आहे.

गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात अनुचित प्रकार घडत असतात. तिच्या अहमदनगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजी नगर, बार्शी आणि नाशिक या सर्वच शहरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये काहीना काही वाद झाल्याचे निदर्शनास आले आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक टवाळखोर, उपद्रवी मनोवृत्तीचे तसेच मद्यपी हजेरी लावतात. त्यामुळे साहजिकच धूडगूस घालणे, गोंधळ घालणे असे प्रकार होतात.

नाशिकची घटना गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु असतानाच घडली. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात असेच गंभीर हाणामारीचे प्रकार घडत असतात. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

हेही वाचा :

The post गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून जिल्हा बंदी करा ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी appeared first on पुढारी.