मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार आहे. सकाळी दहाला येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात होईल. सोळा टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक टेबलावर सहा ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे काम पूर्ण होईल. दरम्यान, निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
तहसील कार्यालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र दाखविल्यानंतरच आत प्रवेश मिळेल. या भागात बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. कॉलेज मैदान परिसरातील चहा दुकाने व इतर टपऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत सर्व ९६ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भाऊबंदकी, वाडे व गावपातळीवरील राजकारणाच्या निकालाची सर्वांनाच उत्कंठा आहे.
हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच
अशी होईल मतमोजणी...
टेबल क्रमांक - ग्रामपंचायतींची नावे
एक - अजंग, देवघट, हिसवाळ, लेंडाणे, राजमाने, वडेल.
दोन - अस्ताने, डाबली, जळगाव (गा.), मथुरपाडे, रावळगाव, वाके.
तीन - आघार बुद्रुक, डोंगराळे, जळगाव (निं.), माणके, रौंझाणे, वळवाडे.
चार - आघार खुर्द, ढवळेश्वर, जळकू, मुंगसे, साजवहाळ, वळवाडी.
पाच - अजंदे, देवारपाडे, जेऊर, मेहुणे, साकूर, वऱ्हाणे.
सहा - भिलकोट, एरंडगाव, कजवाडे, नागझरी, साकुरी नि., विराणे.
सात - भारदेनगर, येसगाव बुद्रुक, कंधाणे, नाळे, सावकारवाडी, वनपट.
आठ - चंदनपुरी, येसगाव खुर्द, कळवाडी, नांदगाव, सवंदगाव, झाडी.
नऊ - चिखलओहोळ, गरबड, कौळाणे (गा.), नरडाणे, शेंदुर्णी, झोडगे.
दहा - चिंचगव्हाण, गाळणे, कौळाणे (नि.), निमगाव, शेरूळ, घाणेगाव.
अकरा - चिंचावड, गारेगाव, कोठरे बुद्रुक, निमगाव खुर्द, सिताणे, लोणवाडे.
बारा - चिंचवे (गा.), गिलाणे, कुकाणे, निमगुले, तळवाडे, मळगाव.
तेरा - दहिदी, गिगाव, खडकी, निमशेवडी, टिंगरी, पाथर्डे.
चौदा - दापुरे, गुगुळवाड, खाकुर्डी, पाडळदे, टेहेरे, सोनज.
पंधरा - दहिवाळ, घोडेगाव, खलाणे, पांढरूण, टाकळी, सायने खुर्द.
सोळा - दसाणे, हाताणे, खायदे, पिंपळगाव, वडगाव, उंबरदे.
हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश