ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव 

वरवंडी www.pudhari.news
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
वरवंडी येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामध्ये उपसरपंचपदी राजश्री जाधव यांचा एका मताने विजय झाला.
उपसरपंच निवडीसाठी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये राजश्री अमोल जाधव, संदीप पंढरीनाथ बर्वे, सुनिता दौलत जाधव यांच्यामध्ये चढाओढ असताना संदीप बर्वे यांनी अर्ज मागे घेतला. तर दोन उमेदवारांमध्ये चुरशीची निवडणूक पार पडून सरपंच यांच्यासह सात सदस्यांनी सहभाग घेतला. या मतदानात राजश्री जाधव यांना चार मते तर सुनीता दौलत जाधव यांना केवळ तीन मते पडली. त्यामध्ये एक उमेदवाराने तटस्थ भूमिका निभावत निवडणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे राजश्री जाधव यांचा एक मताने विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण गटविकास अधिकारी के.पी. सोनार यांनी काम बघितले. ग्रामसेवक गोरख गायकवाड यांनी प्रशासकीय काम बघितले. सरपंच वंदना धुळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळेस गोटीराम जाधव, मधुकर केंग, संदीप बर्वे, नरेंद्र जाधव, गणेश धुळे, भाऊसाहेब बर्वे, निलेश बर्वे, सचिन जाधव, बाळा बर्वे, विकास जीवरख, राहुल जाधव, शाम जाधव, रमेश डांगे, तेजस केंग आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव  appeared first on पुढारी.